Fiction book - Mrugjal - Ch - 26

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Fiction book - Mrugjal - Ch - 26

ऑफीसमधे नयना आपल्या कॉम्प्यूटरवर बसली होती. तिच्या शेजारीच विजय दुसऱ्या कॉम्प्यूटरवर बसला होता. कॉम्प्यूटरच्या मॉनीटरवरील एका डायग्रामकडे बघत विजय रागाने टेबलवर मुठ आदळत म्हणाला, '' शिट ''

'' काय झाल?'' नयनाने विचारले.

'' अगं हा बघ... हा टास्क किती प्रयत्न केले तरी त्याच्या वेळेच्या पुढे जात आहे'' विजय आपल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे तिचे लक्ष वेधीत म्हणाला.
कॉम्प्यूटरवर त्याच्या प्रोजेक्टचा टास्क ग्राफ दिसत होता आणि त्यातला एक टास्क लाल रंगाने हायलाईट केला गेला होता.

"" या प्रोजेक्टची डेडलाईन गाठता गाठता आपणच डेड होऊ की काय असं वाटतं'' विजय चिडून म्हणाला.

'' जस्ट रिलॅक्स ... डोकं शांत ठेव'' नयना त्याला शांत रहाण्याचा इशारा करीत म्हणाली.

'' मला एका गोष्टीची कमाल वाटते आहे की याही परिस्थितीत तू कशी काय शांत राहू शकतेस'' तो म्हणाला.

"" मला एक सांग... त्रागा करुन काही फरक पडणार आहे का?... उलट परिस्थिती अजूनच बिघडणार'' नयना त्याची समजूत काढीत म्हणाली.

तरीही विजयचा चिडलेला मुड काही ठिक होत नाही हे पाहून तिने त्याला त्यावर उपाय सुचविण्याच्या दृष्टीने सांगितले, '' हे बघ... जेव्हा एखादा टास्क डेडलाईनमधे होत नाही आहे असं लक्षात आलं तर त्या टास्कला सबटास्कसमधे डिव्हाईड करायचं... मग बघ कसा सुतासारखा सरळ होतो तो टास्क''

'' तुला वाटतं... हे मी सगळं करुन नसेल बघितलं म्हणून?'' विजय.

पण आता  नयना  शांतपणे तिच्या कामात व्यस्त झालेली पाहून विजय पुन्हा चिडून म्हणाला, '' आता बोलना काय करु ते''

'' थोडं थांब... हे माझं हातातलं काम आधी पुर्ण होवू देत ... मग मी बघते काही करता येतं का ते'' नयना शांतपणे म्हणाली.

तिचा तो शांत पावित्रा बघून विजय अजुनच चिडला आणि आपल्या जागेवरुन उठत म्हणाला, '' आता माझ्या लक्षात आलं की तू एवढी शांत कशी राहू शकतेस?''

"" का राहू शकते?'' नयना.

"" कारण तू बॉसची मुलगी ना... तूला कुणाची भिती?... आणि काही झाले तर तुला कोण जबाबदार धरणार'' तो म्हणाला.

'' विजय... डोन्ट मिक्स बिजिनेस वुईथ अवर रिलेशन्स ऍट होम... हिअर हि इज जस्ट माय बॉस... ऍन्ड फादर ऍट होम..'' नयना आता गंभिर होत म्हणाली.

'' अगं ते म्हणणं सोपं आहे... पण मला सांग कुणाची मजाल जो तुला काही म्हणू शकणार'' विजय.

'' आणि लक्षात ठेव ... माझे वडील या कंपनीचे बॉस आहेत म्हणजे पुर्णपणे मालक नव्हेत... त्यांनाही वर कुणीतरी प्रश्न विचारणारा आहेच ...'' नयना.

नयनाने गोष्ट एकदम गंभिरपणे घेतलेली पाहून विजयने माघार घ्यायची ठरवली. नाहीतर पुढे गोष्टींना वेगळच वळण लागण्याची शक्यता होती. त्याला वाटलं होतं की ती त्याच्या मताशी सहमत होईल. पण तसे न होता ती जास्तच गंभीर झाली होती.

"" हे बघ माणूस चिडला की हे असंच होतं... मला माहित आहे ... हि इज ऑल्सो ऍन्सरेबल टू सम बडी... आय ऍम सॉरी... मुद्दा प्रोजेक्टच्या या टास्कचा आहे... आणि गोष्ट कुठे वेगळ्याच दिशेला भरकटत गेली बघ... आय ऍम रियली सॉरी...'' विजय.

विजयने माघार घेताच नयनालाही गोष्ट पुढे जास्त रेटून धरण्यात तथ्य वाटले नाही.

'' इट्स ऑल राईट...'' नयना.

"" पण आता या टास्कचे काय करायचे?'' विजय म्हणाला.

पण नयना आता काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे आपल्या कामात व्यस्त होती. म्हणून विजय चिडून कॅबिनच्या बाहेर निघून गेला.

कंपनीच्या कॅंटीनमधे कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. कदाचित टी-ब्रेक असावा. तिथेच एका कोपऱ्यात विजय विचारमग्न अवस्थतेत कॉफी घेत बसला होता. तेवढ्यात नयनाही कॅंटीनमधे आली आणि तिही कॉफी मशीनमधून एक कॉफीचा कप भरून कॅंटीनमधे इकडे तिकडे बघत बसण्यास जागा शोधू लागली. कोपऱ्यात बसलेल्या विजयवर येवून तिची नजर स्थिरावली. तिही त्याच्या शेजारी जावून बसली.

'' काय... झालं की नाही डोकं शांत अजून?'' नयनाने विचारले.

काही न बोलता विजयने नुसते तिच्याकडे बघितले.

'' डोन्ट वरी आय ऑल्सो शेअर द इक्वल रिस्पॉन्सिबीलीटी ऑफ द प्रोजेक्ट... '' नयना म्हणाली.

'' ते खरं आहे.. पण त्यातून काहीतरी मार्ग निघणे सगळ्यात महत्वाचे...'' विजय म्हणाला.

'' अरे निघेल... बि पॉसीटीव्ह...'' नयना.

विजय पुन्हा विचारमग्न होवून कॉफी पिऊ लागला.

'' जरा आरशात जावून बघ... काय हाल करुन घेतलेस'' नयना.

'' का काय झालं?'' त्याने चटकन आपल्या चेहऱ्यावर हात फिरवीत विचारले.

'' अरे चेहरा नाही ... केस बघ तुझे... कसे उभे राहाले आहेत... जानी दुष्मन सारखे'' ती त्याची गंमत करीत म्हणाली.

तसे चटकन हाताने त्याने त्याचे केस सारखे करण्याचा प्रयत्न केला.

'' आय थिंक यू निड अ ब्रेक..'' नयना त्याची ती अवस्था बघून म्हणाली.

तरीही विजय काहीच बोलत नाही हे पाहून नयना पुढे म्हणाली,
'' संध्याकाळी काय प्रोग्रॅम आहे तुझा?''

'' काही नाही... नथींग स्पेशल... आजकाल संध्याकाळी घरी गेल्यानंतर एवढं थकल्यासारखं होतं की काही करायची इच्छाच राहत नाही..'' विजय म्हणाला.

'' देन यू डिस्परेटली निड अ ब्रेक...'' नयना म्हणाली.

'' म्हणजे? ... काय विचार आहे तूझा... वडीलांना सांगून नोकरीतून ब्रेक द्यायचा विचार आहे की काय तूझा...'' विजय नॉर्मल होण्याचा प्रयत्न करीत गमतीचा आधार घेत म्हणाला.

'' अरे नाही... मी जरी सांगीतलं तरी ते माझं ऐकतील असं वाटतं तुला?... ''नयना म्हणाली.

'' डोन्ट से दॅट... पुत्रमोह... म्हणजे तुझ्या बाबतीत पुत्रीमोह... सगळ्यात बलवान असतो म्हणतात... धृतराष्ट्राची गोष्ट माहित नाही का तुला '' विजय म्हणाला.

'' धृतराष्ट्र?.... म्हणजे तु माझ्या वडीलांना धृतराष्ट्र म्हणतोस की काय?'' नयना.

''अगं नाही... आय जस्ट गेव्ह ऍन एक्साम्पल'' विजय.

'' अच्छा हो का?... तु इकडे त्यांच्याबाबतीत काहीही एक्साम्पल दे पण तुला कदाचित माहित नसेल... यू आर हिज फेवरेट'' '' नयना हसत म्हणाली.

'' खरंच '' विजय.

'' खरंच... मी का बरं खोटं बोलेन'' नयना.

'' देन व्हॉट डू यू से?'' विजय परत मुळ विषयावर येत म्हणाला.

'' कशाबद्दल?'' नयना.

'' अगं तु संध्याकाळच्या प्रोग्रॅमबद्दल काहीतरी म्हणत होतीस'' विजय.

'' चल एखाद्या मुव्हीला जावूयात... काय कशी आयडीया आहे?'' नयना.

आता कुठे विजयचा चेहरा चमकायला लागला होता, '' यस दॅट विल बी अ नाईस ब्रेक ...ऍन्ड विथ यूअर कंपनी ... दॅट विल बी इव्हन मोर नाईस... इजन्ट इट'' विजय म्हणाला.

नयना नुसती त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसली.

'' अजून कुणाला घ्यायचे?'' विजयने अंदाज घेत विचारले.

"" विजय तू पण ना कधी कधी ... फारच बॅकवर्ड सारखा वागतोस बघ... डू यू थींक आय ऍम गोईंग टू ब्रींग माय मॉम ऑर डॅड विथ मी ...'' नयना.

'' अगं तसं नाही ... मला वाटलं अजुन कुणी तुझी फ्रेंड वैगेरे...'' विजय.

'' नो जस्ट यू ऍन्ड मी'' नयना.

'' यस्स... दॅट विल बी फंटास्टीक आयडीया...'' विजय आनंदाने म्हणाला.

क्रमश:..


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network