Romantic Novel - Mrugajal - Ch- 27

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Romantic Novel - Mrugajal - Ch- 27

विजय आणि नयना मूव्ही बघत होते. तेव्हा नयनाच्या लक्षात आले की विजयजवळचे पॉपकॉर्न संपले आहेत.

"" फिनिश्ड? ... सो क्वीकली?... बघ माझी तर अजून शिगसुध्दा हललेली नाही आहे'' नयना.

'' यू नो आय ऍम सो क्वीक इन इटींग ... आणि पुरुषांचा खाण्याचा स्पिड बायकांच्या खाण्याच्या स्पिडपेक्षा नेहमीच जास्त असतो.... बायका खाण्यातच जास्त वेळ गमावतात '' विजय म्हणाला.

'' खाण्याच्या स्पिडवरुन तुमच्या स्वभावाचा आणि मनाच्या स्थितीचा अंदाज येतो.'' नयना.

'' अच्छा... तर मग सांगकी माझ्या स्वभावाबद्दल आणि मनाच्या स्थितीबद्दल..'' विजय.

'' यू सिम टू बी ... कन्फुज्ड... '' नयना.

'' अच्छा ... आणि ज्याच्या खाण्याचा स्पिड कमी आहे... त्यांचा स्वभाव कसा असतो...'' विजय.

'' ते स्वभावाने खंबीर... कोणत्याही परिस्थितीने लवकर न खचनारे... आणि ऑफ कोर्स ते कन्फुज्ड नसुन एकदम क्रिस्टल क्लीअर असतात''

'' ओ आय सी'' विजय.

नयना आपल्या पॉपकॉर्नचे पाकीट त्याच्या समोर धरीत म्हणाली, '' पण लक्षात ठेव... व्हेन यू आर विथ सम लेडी... दिज आर नॉट गुड एटीकेट्स...''

'' हू केअर्स...'' विजय खांदे उडवित म्हणाला.

'' दॅट्स ऒल्सो ट्रू... व्हेन यू विल बी इन लव्ह विथ समबडी ... यू विल केअर... ऑर द अदर वे टू से... व्हेन यू केअर फॉर समबडी ... प्रोबॅब्ली यू आर इन लव्ह विथ हर'' नयना.

'' लव्ह?... नो चान्स '' विजय.

'' लेट्स सी'' नयना.

काही वेळ पुन्हा ते मूव्ही बघण्यात मग्न झाले.

'' तुला माहित्ये... एकदा मी आणि माझी मावसबहिण हॉर्र्र मूव्ही बघायला गेलो होतो... तिकडे हॉर्र्र सिन आला की माझ्या मावसबहिणीचा खायचा स्पिड वाढायचा... पुर्ण मुव्हीभर तिने 5 पॉपकॉर्नची पाकिटं खाल्ली... जेव्हाकी माझं एकच संपायचं होतं'' नयना पुन्हा त्याच गोष्टींचा धागा धरुन पुढे बोलायला लागली.

'' यू नो... इट प्रुव्हस समथींग ... '' विजय.

'' व्हाट कॅन इट प्रुव्ह?''

'' दॅट यू आर टू स्लो... रादर डेड स्लो '' विजय म्हणाला.

'' इज इट?'' नयनाने खट्याळपणे त्याच्या समोरुन आपलं पॉपकॉर्नचं पाकिट मागे खेचलं.

विजय तिच्याकडे पाहून नुसता हसला.

पुन्हा बराच वेळ त्यांच्यात काही न बोलता निघून गेला. विजय मुव्हीच्या स्टोरीत गढून गेलेला दिसत होता आणि लक्ष देवून मूव्ही पाहत होता. मूव्ही पाहता पाहता त्याच्या लक्षात आले की आपला डावा खांदा जड पडल्यासारखा झाला आहे. पाहतो तर त्याच्या डाव्या खांद्यावर डोकं ठेवून नयना शांतपणे झोपी गेली होती. विजयने प्रेमाने तिच्या चेहऱ्याकडे बघितले. खरंच किती निरागस आणि लोभस चेहरा होता तो!

मूव्ही संपल्यानंतर विजय आणि नयना मूव्ही हॉलमधून गर्दीतून रस्ता काढीत बाहेर येत होते. गर्दीतून चालता चालता विजयने नयनाच्या चेहऱ्याकडे बघितले. झोपेतून हल्लीच उठल्यामुळे तिचे डोळे आणि चेहरा अजूनच ताजातवाना आणि लोभस वाटत होता.

'' खरंच यासारखा दूसरा कोणताच ब्रेक नसेल'' विजय नयनाकडे बघत म्हणाला.

नयना नुसती त्याच्याकडे बघून हसली.

'' नाही म्हणजे मी मुव्ही हॉलमधे येवून झोपण्याबद्दल बोलतो आहे'' विजय तिची छेड काढीत गमतिने म्हणाला.

नयना त्याच्या दंडावर खोटं खोटं मारत म्हणाली, '' झोप आली म्हणून झोपले... त्यात काय... सिनेमा बघण्यासाठी पैसे मोजले म्हणून झोप आली तरी डोळे फाडत सिनेमा बघायचा... हे नाही बॉ मला पटत... वुई जस्ट केम हिअर फॉर अ ब्रेक ऍन्ड एंन्जायमेंट... सो दॅट्स द मेन''

'' यू सिम्स टू बी क्लीअर अबाऊट एव्हरी फंडा'' विजय म्हणाला.

'' यस ... नॉट ओन्ली क्लिअर.. ऍज आय सेड.... क्रिस्टल क्लिअर... आणि मला सगळ्याच बाबतीत क्रिस्टल क्लियर रहायला आवडतं'' नयना म्हणाली.

'' बरं मी कसा वाटतो?'' विजयने अनायसेच विचारले.

'' म्हणजे कशाबद्दल?'' नयनाने चमकून विचारले.

'' नाही म्हणजे... क्लिअर ऑर नॉट क्लिअर...'' विजयने विचारले.

'' ओ .. यूअर ऍटीट्यूड... मी मघाशीच सांगीतलं आहे...'' नयना.

'' काय?''

" यू सिम्स टू बी बीट कन्फ्यूज्ड.. ऍम आय राईट?'' नयना म्हणाली.

'' हाऊ कॅन आय से दॅट... दॅट टू अबाऊट मायसेल्फ... इफ यू से ... देन इट मस्ट बी ट्रू'' विजय म्हणाला.

''नो यू शूड हॅव यूवर ओन कव्हिक्शन...दॅट इज ऑल्सो वन सिम्टम ऑफ कन्फुजन... समबडी सेज... दॅट मिन्स इट्स नॉट नेसेसरी टू बी ट्रू...'' नयना म्हणाली.

'' खरंच तुझ्यासोबत... गप्पांत जिंकणे म्हणजे अशक्यच आहे...'' विजय म्हणाला.

'' इज इट?'' नयना.

'' नाही ... म्हणजे प्रथमच माझा अश्या व्यक्तीसोबत सामना होतोय की ज्याच्यासोबत गप्पांत जिंकणं मला अवघड जातय.'' विजय.

'' कधी कधी आपल्याला कुणा व्यक्तीबरोबर हरायला आवडतं...तसं तर होत नाही ना तुझ्यासोबत?'' नयना.

'' म्हणजे?'' विजय.

'' म्हणजे या जगात दोन प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात... एक ... जे की तुझाला तुमचे फॉलोअर असावे असे वाटते... म्हणजे जिथे तुम्हाला लिडरचा रोल प्ले करायला आवडतो... आणि दुसरे... ज्यांचे फॉलोअर व्हायला तुम्हाला आवडतं... म्हणजे तुम्ही त्यांना लिडर म्हणून एक्सेप्ट करता '' नयना.

'' बापरे .. बापरे... हे म्हणजे खुपच फिलॉसॉफिकल झालं बघ... अगं मी कॉलेजला असतांना माझे मित्र मला फिलॉसॉफर म्हणून ओळखायचे... पण आता बघ या फिलॉसॉफरलाच आता एक फिलॉसॉफर भेटला आहे...'' विजय.

'' फिलॉसॉफर... मला तर पहिल्यांदाच कुणी फिलॉसॉफर म्हणत आहे'' नयना.

'' आणि खरं सांगु तुला... तु म्हणतेस ना की मी कन्फुज्ड वाटतो... पण एवढा कन्फुज्ड मी आधी केव्हाच नव्हतो... एवढ्यात मला काय होत आहे मला तर काही कळतच नाही'' विजय.

'' अरे होतं असं कधी कधी...आणि जिवनात जेव्हा असं होतं... तुमच्या जिवनाला काहीतरी नविन वळण लागणार असतं बघ'' नयना.

सिनेमा बघितल्यानंतर हॉटेलमधे मस्तपैकी डिनर घेण्याचा प्रोग्रॅम आधीच ठरलेला दिसत होता. एका आलिशान हॉटेलमधे जेवता जेवता पुन्हा गप्पांचे सुत्र विजयने पुढे सरकवले,
'' यस बट... आय रियली एन्जॉइड ईट '' विजय घास घेता घेता म्हणाला.

'' काय मूव्ही?'' ... मूव्ही तर बकवास होती... म्हणूनच तर मी झोपी गेले'' नयना म्हणाली.

'' नाही मी मुव्ही बद्दल नाही बोलतोय... पुर्ण मूव्हीभर तूझं डोकं माझ्या खांद्यावर होतं.. त्याबद्दल मी बोलतो आहे'' विजय खट्याळपणे म्हणाला.

'' यू नॉटी बॉय '' नयना लाजून म्हणाली.

'' बघ अजूनही माझा डावा खांदा मुंग्या आल्यासारखा जड पडला आहे'' विजय म्हणाला.

'' खरंच... देन यू मस्ट सी यूवर डॉक्टर '' नयना म्हणाली.

'' व्हाय?'' विजयने विचारले.

'' बिकॉज इट इज वन ऑफ द सिम्टम्स ऑफ हार्ट प्रॉब्लेम'' नयना.

'' यस इट सिम्स टू बी अ हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम '' विजय तिच्याकडे खट्याळपणे बघत म्हणाला.

नयनाने लाजून मान खाली घातली.

क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

7 comments:

 1. i want to more plzzz

  ReplyDelete
 2. i want more plzz!!

  ReplyDelete
 3. i want more plzzz!!!!!!

  ReplyDelete
 4. I want to read next chapter..

  ReplyDelete
 5. i wait for next post................. :-)

  ReplyDelete
 6. wow i enjoyed this post..... but my expectation have raised. i m eagerly waiting for you next post. please post your next chapter soon... i waiting.

  ReplyDelete
 7. So sad..... but like it.....

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network