Next Episode - Novel Mrigjal - Ch 21

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Next Episode - Novel Mrigjal - Ch 21

Valuable Quotes :
Wisdom doesn't necessarily come with age. Sometimes age just shows up all by itself.
...Tom Wilson

Wisdom is knowing what to do next; virtue is doing it.
...David Starr Jordan

बराच वेळ काही न बोलता विजय आणि प्रिया पायऱ्यांवर बसलेले होते. विजयने जो निर्णय घेतला होता त्यावर प्रिया काहीच बोलली नव्हती. तरीही ती त्याच्या निर्णयाने कन्वींस झालेली दिसत नव्हती.

'' प्रिया'' विजयने तिला ती तिच्या विचारात एवढी गढलेली पाहून आवाज दिला.

'' अं '' जणू तिने विचारात गढलेली असतांनाच त्याला प्रितिसाद दिला.

'' आजपर्यंत ज्या गोष्टी सांगायचं मी टाळत होतो आणि तुही त्या विचारायचं टाळायचीस त्या गोष्टी मी आज तुला सांगणार आहे'' विजय म्हणाला.

'' कोणत्या?''

'' आज चार वर्ष झाले असतील त्यावेळी मी दहावीत होतो... आमचं चौकोनी कुटूंब फार सुखी होतं त्यावेळी... जरी ते दाख़वत नसले तरी माझ्या वडीलांचा माझ्या बहिणीवर फार जिव होता.. म्हणजे अजुनही आहे... तेव्हा ते फार क्वचीत प्यायचे... म्हणजे... एखाद्या वेळेस मित्रांसोबत... खुप खुश असले म्हणजे... '' विजयने लांब श्वास घेतला आणि तो पुढे पुन्हा सांगु लागला.

'' माझ्या बहिणीचं ग्रज्यूएशन संपलं होतं... आणि तिने नंतर एमपीएससी करायचं ठरवलं होतं... एमपीएससी च्या परिक्षेत ती पहिल्या अटेम्पमधेच पास झाली होती... आणि नंतर तिला इंटरव्ह्यूला जायचं होतं.... इंटरव्ह्यूची तयारीही तीने कसून केली होती... झालं इटरव्ह्यूचा दिवस जवळ आला आणि ती इटरव्हूला जायला निघाली... जेव्हा ती इंटरव्ह्यच्या जागी पोहोचली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचे सर्व ओरीजीनल कागदपत्र हरवले आहेत... कागदपत्रांच्या अभावी त्या लोकांनी तिला इंटरव्ह्यू देऊ दिला नाही... झालं... तिच्या मनावर त्याचा एवढा परिणाम झाला की ती जेव्हा परत आली तेव्हा ती ती राहालीच नव्हती... ती पुर्णपणे बदललेली होती... तिला सर्वांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की सर्व कागदपत्रांच्या डूप्लीकेट्स पुन्हा काढता येतील... आणि त्या इंटरव्ह्यूचं काय पुन्हा दुसऱ्या वर्षी परिक्षा पास होवून तो देता येईल... किंवा दुसऱ्या अजुन ऍपॉर्चुनीटीज उचलता येतील.. पण ती कोणत्याही गोष्टीला काहीच प्रतिक्रीया किंवा प्रतिसाद देत नव्हती... दिवसेदिवस उलट तिचा मानसिक आजार वाढतच जात होता... वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेवून उपचार करण्याचा प्रयत्नही केला पण इकडे चांगल्या डॉक्टरांच्या अभावी आणि पैशाच्या अभावी त्यांना विशेष काही करता आले नाही... त्यामुळे वडीलही एवढे खचुन गेले की त्यांच पीणं वाढलं... घरी आले की त्यांना तिची ती अवस्था कदाचित पाहवल्या जात नव्हती .. ते जास्तीत जास्त घरापासून दूर राहू लागले... ते जुगारही खेळू लागले... तिच्या आजाराच तर सोडाच घरात खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स होवू लागले... ''

पुन्हा विजय थोडा थांबून पुढे बोलू लागला '' एकवेळ तर मी ठरवलं होतं की शिक्षण सोडून देवून कुठे मोलमजूरी करुन घरात पैशाची मदत करावी ... पण तेवढ्या पैशाने काही होणार नव्हतं... मग आईनेचे लोकांचे पापड, लोणचे... इत्यादी कामं करुन कमीत कमी घरच्या खर्चाची बाजु सांभाळली... आणि मीही आपलं शिक्षण सांभाळून सकाळी पेपर वैगेरे टाकुन घरी शक्य होईल तेवढी मदत करु लागलो... पण तेवढ्याने काही होणार नव्हते... म्हणून मी तेव्हाच ठरवून टाकले की बारावी झाल्यानंतर लौकरात लौकर नोकरी लागेल आणि बऱ्यापैकी पैसा मिळेल असा कोर्स करायचा... ''

विजयचे बोलणे संपल्यानंतर प्रिया म्हणाली, '' विजय... तु किती सहन केलसं मी समजू शकते... आणि मी हेही सांगते की या परिस्थीतीत तुझा निर्णय अगदी योग्य आहे''

विजयने तिच्याकडे डोळे भरुन पाहाले. तो प्रियाला अल्लड नादान असच आतापर्यंत समजत आला होता. पण आज प्रथमच लक्षात आले होते की ती किती समजुतदार आहे.


विजयने इंजिनीअरींगला ऍडमिशन घेतली आणि प्रियाने नाईलाजाने का होईना मेडीकलला ऍडमिशन घेतली. तिचं गणित नसल्यामुळे ती इंजिनिअरींगला कोणत्याही परिस्थितीत ऍडमिशन घेवू शकत नव्हती. आणि विजयने एकदा केलेला निर्धार मोडनं कधीही शक्य नव्हतं हे तिला माहित होतं. तिनेही त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्याने जे कारण दिलं होतं त्यात तथ्य होतं. आणि प्रिया विजयच्या आणि त्याच्या कुटूंबाच्या मधे येवू इच्छीत नव्हती. शेवटी विजय आणि प्रिया दोघांचीही आपापल्या मार्गाने विजयी घोडदौड सुरु झाली.

काळाच्या ओघात दिवसांवर दिवस निघून जात होते. तसं विजय आणि प्रियांचे मधे मधे पत्र पाठवनं सुरुच होतं. आणि मधे मधे ते जेव्हा परिक्षेनंतरच्या सुट्यात आपल्या गावी आपापल्या घरी परत येत तेव्हा ते भेटतही असत.

दिवसांचे महिने होता होता आणि महिन्यांचे वर्ष होता होता चार वर्ष कसे भर्रकन निघून गेले. आणि विजय इंजिनियर व्हायला केवळ काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहाला होता. प्रियानेही मेडीकलला चार वर्ष घालवली होती पण तिची डिग्री हाती यायला अजुन वर्षाचा कालावधी बाकी होता.

आज विजय फार आनंदात होता. कारण आज त्याला इंजिनिअरींगची डीग्री मिळाली होती. आणि त्या आनंदात अजुन भर म्हणजे त्या निमित्याने त्याला आज प्रियाही भेटायला येणार होती. विजय रेल्वे स्थानकावर तिच्या रेल्वेची वाट पाहत थांबला होता. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर एक रेल्वे येवून थांबली.

हीच ती रेल्वे.. हो हीच.. जिने प्रिया येणार आहे... म्हणजे आली असेल...

त्याची भिरभिरती नजर प्लॅटफॉर्मवर सगळीकडे तिला शोधू लागली. प्रवाश्यांचे जणू लोटच्या लोट प्लॅटफॉर्मवरुन स्थानकातून बाहेर जाणाऱ्या दरवाजाकडे जात होते.

आता एवढ्या गर्दीत तिला शोधने म्हणजे खरोखर एक महाकठीण काम आहे...
आपण तिला घ्यायला आलो खरं... पण ती भेटेल याची शक्यता कमीच..

विजय निराशेने विचार करीत होता.

प्रवाश्यांचा गाडीतून उतरणारा लोट आता कमी झाला होता. एखाद दुसराच प्रवाशी आपापलं जड सामान कुलीच्या स्वाधीन करुन त्याच्या मागे मागे चालतांना दिसत होता.
तेवढ्यात त्याची भिरभिरती नजर एका जागी जावून खिळली.

हो ती प्रियाच...

त्याच्या निराश चेहऱ्यावर एकदम आनंद चमकायला लागला. तो तिकडे घाई घाई जावू लागला. आता तिचीही नजर त्याच्यावर पडून दोघांची नजरानजर झाली. तिचा प्रवासामुळे कोमेजलेला चेहरा एकदम उजळला. तिही आता घाई घाई त्याच्याकडे येत होती. सामान सांभाळून त्याच्याकडे घाई घाई येण्यात तिचा नुसता गोंधळ उडत होता. आता दोघेही एकमेकांकडे धावायला लागले होते. एकेमेकांजवळ पोहचताच त्यांनी एकमेकांना आपसूकच कडकडून मिठी मारली.

एका कॅफेमधे विजय आणि प्रिया समोरासमोर बसून कॉफी घेत होते.

'' खरंच किती दिवसांनी आपण या कॅफेत आलो'' प्रिया म्हणाली.

'' तू तर अशी म्हणत आहेस की जणू आपण नेहमीच या कॅफेत यायचो'' विजय तिला छेडत म्हणाला.

'' नेहमी जरी नाही तरी बऱ्याच वेळा यायचो..'' प्रिया म्हणाली.

'' आणि जेव्हा केव्हा यायचो तुच पैसे भरायचीस '' विजय.

'' राजेश केव्हा येईल?'' प्रिया दरवाजाकडे पाहत म्हणाली.

'' त्याला माहित असेल तर तो येईल ना... आणि माहित असेल तरीही तो येण्याची शक्यता कमीच'' विजय म्हणाला.

'' का तू त्याला सांगितलं नाहिस?''

'' नाही..''

'' का?'' प्रियाने विचारले.

'' अगं आता तुला काय सांगू... ते जरा मोठं प्रकरण आहे...'' विजय म्हणाला.

'' अरे का? ... भांडण बिंडण केलस की काय त्याच्याशी'' प्रियाने विचारले.

'' अगं भांडण करायला का आम्ही आता लहान आहोत... खरं म्हणजे आपला रिझल्ट आला आणि आपले वेगवेगळे मार्ग तेव्हाच ठरले...'' विजय म्हणाला.

'' मग काय झालं? ... आपले मार्ग वेगळे असले तरी आपण कसे भेटतो?'' प्रिया म्हणाली.

'' आपण दोघे भेटतो ... कारण आपली तशी इच्छा असते'' विजय म्हणाला.

'' म्हणजे त्याची तुला किंवा मला भेटण्याची इच्छा नसते की काय?'' प्रियाने विचारले.

'' हो तसंच समज... रिझल्ट लागला आणि तो कॉलेजमधून निघून गेला ... तेव्हापासून तो आपल्यापासून दुर दुर होत गेला.. मी जवळ जाण्याचा प्रयत्नही केला... त्याला, त्याच्या मनस्थितीला सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला... पण व्यर्थ... त्याची पुन्हा जवळ येण्याची इच्छाच नव्हती मुळी... '' विजय सांगत होता.

'' म्हणजे तो तुला आता भेटत नाही की काय?'' प्रियाने विचारले.

'' भेटतो... पण फार क्वचित .. आणि त्या भेटीमधे पुर्वीसारखी उर्मी नसते... अगदीच एखाद्या अपरीचितासारखा वागतो...'' विजय म्हणाला.

क्रमश:...

Valuable Quotes :
Wisdom doesn't necessarily come with age. Sometimes age just shows up all by itself.
...Tom Wilson

Wisdom is knowing what to do next; virtue is doing it.
...David Starr Jordan

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network