Sahitya Book - Mrugjal - Ch 20

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Sahitya Book - Mrugjal - Ch 20

New year Quotes -
Youth is when you're allowed to stay up late on New Year's Eve. Middle age is when you're forced to. ... Bill Vaughn

An optimist stays up until midnight to see the new year in. A pessimist stays up to make sure the old year leaves. ... Bill Vaughan

राजेश निघून गेल्यापासून बराच वेळ विजय आणि प्रिया पायऱ्यांवर काही न बोलता आपापल्या विचारात गढून गेल्यागत बसले होते.

'' पण त्याला एवढे कमी मार्कसमिळाले तरी कसे?'' प्रियाने शांतता भंग करीत विचारले.

विजय काहीच बोलला नाही.

'' आपल्याला एवढे चांगले मार्कस मिळाले आणि बिचाऱ्याला आपल्याएवढा आणि आपल्यासोबतच अभ्यास करुन एवढे कमी मार्कस कसे काय मिळाले'' प्रिया.

तरीही विजय काहीच बोलला नाही.

'' मला तर वाटते पेपर तपासण्यात काही तरी घपलत झाली असावी ... किंवा दुसऱ्या कुणाचे मार्कस याला आणि याचे मार्कस दुसऱ्या कुणाला गेले असले पाहिजेत ... माझे पप्पा एकदा सांगत होते की असं होतं कधी कधी '' प्रिया.

विजय एकदम शांत होता.

'' मला वाटतं त्याने पेपर्स रिव्हॅल्यूएशनला म्हणजे रिकाऊंटीगला टाकावेत....त्यात नक्कीच काहीतरी फरक पडेल'' प्रिया.

'' हे बघ प्रिया... तुम्हाला किती मार्कस मिळतात हे तुम्ही किती अभ्यास केला ... यावर अवलंबून नसते...'' विजय.

'' मग ?'' प्रिया.

'' यात तुमची कुवत हा भागही येत असतो... आता बघ त्याला आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या सराव परिक्षेत असेच मार्कस मिळत होते... मग या फायनल परिक्षेत तरी त्याने एखाद्या चमत्काराची अपेक्षा का करावी'' विजय.

'' अरे पण... त्याचे सगळे पेपर्स यावेळी चांगले गेले असा सांगत होता तो'' प्रिया.

'' सराव परिक्षेतही त्याचे पेपर्स चांगले जायचे... आणि चांगले म्हणजे त्याच्या कुवतीप्रमाणे ते चांगलेच गेले होते '' विजय.

'' हो तु म्हणतोस तेही बरोबर आहे म्हणा... पण आपल्यासोबत अभ्यास करणारा... आपल्या एवढाच अभ्यास करणारा ... आपल्या मित्रालाच.... आपल्यापेक्षा एवढे कमी मार्कस मिळावे... थोडं वाईट वाटतच... नाही ?'' प्रिया.

'' हो वाईट वाटणं साहजिकच आहे... आणि त्याला सुध्दा वाईट वाटणं साहजिकच आहे... पण बघ तो लवकरच सावरेल... त्यामुळॆ आपण त्याची एवढी काळजी करण्याचं काहीच कारण नाही...'' विजय.

आताकुठे प्रियाला बरं वाटत होतं. विजयने कोणतीही गोष्ट एवढ्या चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितल्यावर तिला नेहमीच ते पटत असे. आणि विजयही ती गोष्ट अगदी मुद्देसुदपणे आणि तिला समजेल अश्या योग्य तऱ्हेने समजावून सांगत असे.
थोडा वेळ पुन्हा काही न बोलता शांततेत निघून गेला.

'' अरे हो... '' प्रिया भानावर आल्यागत म्हणाली.

विजयने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहाले.

'' तो मघाचा विषय राहालाच की''

'' कोणता?''

'' तो ऍडमिशनचा'' प्रिया.

'' त्याला अजुन वेळ आहे'' विजय विषय टाळण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

'' वेळ कसला?... आपल्याजवळ जेमतेम 8 दिवस असतील... कुठे ऍडमिशन घ्यायची हे निश्चीत करण्यास'' प्रिया.

विजयने पुन्हा मौनाचा चा आधार घेतला.

'' हं सांग मग आपण कोणत्या मेडीकल कॉलेजमधे ऍडमिशन घ्यायची?'' प्रियाने विचारले.

विजयने तिच्याकडे पाहाले आणि पुन्हा समोरच्या मोठमोठ्या हवेच्या झोतामुळे डोलावणाऱ्या अशोकाच्या झाडांकडे पाहात तो पुन्हा विचारात गढून गेला.

'' खरंच तुमच्यासोबत राहून आपला चांगला गृप जमला होता... आणि आतातर तुमच्याशिवाय राहाण्याची कल्पनासुद्धा करवली जावू शकत नाही'' प्रिया म्हणाली.

'' राजेश तर आपल्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहू शकणार नाही असं दिसतं'' विजय म्हणाला.

'' कमीत कमी आपण जिथे ऍडमिशन घेवू त्या गावात तर तो ऍडमिशन घेवू शकतो'' प्रिया.

'' कुणास ठाऊक... आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात'' विजय.

'' पण आपण दोघे तर सोबत राहू शकतो'' प्रिया म्हणाली.

'' मला तर आता तेही शक्य वाटत नाही आहे'' विजय तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळत म्हणाला.

'' म्हणजे?... तू असा कसा बोलतोस?... तूच तर नेहमी म्हणतोस की.. बी ऑलवेज पॉझीटीव्ह... '' प्रिया म्हणाली.

'' कारण मी मेडीकलला नाही ... इंजिनिअरींगला ऍडमिशन घेत आहे'' विजय दृढतेने म्हणाला.
प्रियाच्या चेहऱ्यावर एकदम खिन्नता पसरली.

'' काय? ... तु आत्तापर्यंत कधी बोलला नाहीस?'' प्रिया.

विजय अजुनही आपल्या विचारात गढून गेल्यागत शांतच होता.

'' पण का?... तुला तर मेडीकललाही सहज ऍडमिशन भेटू शकेल ... आणि मेडीकलला ऍडमिशन भेटतांना इंजिनिअरींगला ऍडमिशन घेणारा मुर्खच म्हणायला पाहिजे...'' प्रिया चिडून म्हणाली.

'' तु त्याला मुर्खपणा म्हण की काही म्हण... पण मी इंजिनिअरींगला ऍडमिशन घेणार आहे''

'' पण का? ... हे तर सांगशील'' प्रिया.

'' त्याला एक मोठे कारण आहे'' विजय म्हणाला.

'' कोणतं?''

'' मला माहित नाही ... तुला पटेल की नाही पण...'' विजय.

'' तु तुझं कारण तर सांगशिल ... '' प्रिया त्याचं वाक्य अर्ध्यावर तोडत चिडून म्हणाली.

'' कारण मला लवकरात लवकर नोकरी मिळणं फार आवश्यक आहे... माझ्या घराची विस्कळीत झालेली घडी नीट बसवणं ही माझी पहिली प्राथमिकता आहे... आणि लवकर नोकरी मिळवायची असेल तर इंजिनिअरींग करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आतातरी माझ्याजवळ दिसत नाही आहे...'' विजय म्हणाला.

प्रिया आता गंभीर आणि शांत झालेली दिसत होती आणि ती काहीच बोलत नव्हती. त्याने सांगितलेलं कारण कदाचित तिला पटलेलं होतं. पण तिच्या चेहऱ्यावर दु:खाच्या छटा अजुनही स्पष्ट दिसत होत्या. नंतर विचार करता करता पुन्हा ती चिडून म्हणाली,

'' आणि हे तु मला आता सांगतो आहेस... आधी सांगितलं असतं तर मी मॅथेमॅटीक्स नसतं का घेतलं?... मला तर वाटतं की तु माझ्यापासून दूर राहण्याचं आधीपासूनच ठरविलेलं दिसतं'' प्रिया म्हणाली.

'' प्रिया तू अगदी वेडी आहेस... एखाद्या गोष्टीसाठी आपण किती करायचं याला काही मर्यादा असतात... मला हे माहित होतं म्हणूनच मी तुला आधी कधी सांगितलं नाही... माझ्यासाठी मुर्खासारखं तू स्वत:च आयूष्य उध्वस्त करुन घ्यावं .. हे मला केव्हाच पटलं नसतं.'' विजय म्हणाला.

विजय हे बोलला आणि प्रियाचा इतक्या वेळपासून थोपून धरलेला बांध तूटला,

'' तू मला एवढंच ओळखलंस?'' ती कसीबशी बोलली आणि आपल्या अश्रूंना आवरण्याचा प्रयत्न करु लागली.

'' अगं वेडाबाई ... '' तो उठून तिच्याजवळ गेला आणि तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला,

'' अगं आपण कुठेही गेलो तरी ... आपली मैत्री कायमच राहील की...''

'' हे बघ, विजय.. पुर्वी माझ्या जीवनाला काही दिशा नव्हती... काही अर्थ नव्हता... जीवन जगायचं म्हणून मी जगत होते... तू माझ्या जिवनात मार्गदर्शक म्हणून आलास आणि माझ्या जिवनाचा कायापालट झाला... तूझ्यामुळेच मी एवढे मार्कस मिळवू शकले... तू नसतास तर कदाचित मी पास झालेही असते .. पण मेडीकलला जाण्याइतके मार्कस मला निश्चितच मिळाले नसते... तू माझ्या जिवनाला एक उद्देश्य दिला, मला जगणं शिकवलंस ... आणि आता तूच मला सोडून जाणार तर माझं कसं व्हायचं ..'' ती त्याची कॉलर पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली.

त्याने तिला जवळ ओढून घेतले. विजयला माहित होते की तिला आता कितीही समजावून सांगितले तरी ती समजणार नव्हती. तो नुसता तिच्या पाठीवरुन हात फिरवीत तिला थोपटत होता.

क्रमश:...

New year Quotes -
Youth is when you're allowed to stay up late on New Year's Eve. Middle age is when you're forced to. ... Bill Vaughn

An optimist stays up until midnight to see the new year in. A pessimist stays up to make sure the old year leaves. ... Bill Vaughan

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

6 comments:

 1. ow once more suspense great come fast with ur posts m waiting

  ReplyDelete
 2. Nice One,Interesting Story

  ReplyDelete
 3. khoop wat pahayia lavala ho. jara lavkar post kart ja na pls.

  ReplyDelete
 4. Khup chan aahech pan vachta vachta chatkan dolyat ashru aannari aahe manala ved laun jaanari............awesome story............

  ReplyDelete
 5. NICE STORY ... I GOT TO LEARN SO MANY THING IN THIS STORY

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network