Books Online - Novel - Mrugajal - Ch- 39

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


With what a deep devotedness of woe
I wept thy absence - o'er and o'er again
Thinking of thee, still thee, till thought grew pain,
And memory, like a drop that, night and day,
Falls cold and ceaseless, wore my heart away!
... Thomas Moore
We must embrace pain and burn it as fuel for our journey.
...Kenji Miyazawa

प्रियाचा विजयला डॉक्टरकडे घेवून जाण्याचा पहिला प्रयत्न पुर्णपणे फसला होता. डॉक्टरांनी पहिल्या सिटींगनंतर त्याला पुन्हा बोलावले होते. पण तो पुन्हा जाण्याचे तर दूरच, त्या डॉक्टरचे नाव काढण्यास तयार नव्हता. आणि प्रियालाच नाही नाही ते बोलला होता. प्रियाने हृदयावर दगड ठेवून त्याने जे जे आरोप केले होते ते निमूटपणे ऐकून घेतले होते. थोडक्यात काय तर त्याला काहीतरी सायकीयाट्रीस्ट प्रॉब्लेम आहे हे तो मान्य करण्यास बिलकूल तयार नव्हता. पण प्रिया हार मानन्यास तयार नव्हती. पण एक प्रयत्न पुर्णपणे फसल्यानंतर तिला आता कळत नव्हते की त्याला तिथे कसे न्यावे. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही तिला त्या गोष्टी मनाला लावून घेवून थांबन्यासारखे नव्हते. तिला तिची रोजची दवाखान्याची प्रॅक्टीस पुर्ववत सुरु ठेवायची होती. कारण पुर्वीपेक्षा आता तिला त्या प्रॅक्टीसपासून मिळणाऱ्या पैशाची खरी गरज होती. विजयला त्या गर्तेतून काढण्यासाठी. पण नुसता पैसा असूनही काही उपयोग दिसत नव्हता.

एक दिवस अशीच प्रिया आपल्या दवाखाण्यात रोजचे पेशंट अटेंड करीत असतांना राजेश आणि त्याची बायको पुन्हा दवाखान्यात आले. त्याच्या बायकोच्या रेग्यूलर चेकअपचा भाग म्ह्णून.

'' अरे ये राजेश... कमल... या...'' प्रियाने त्यांचं स्वागत केलं.

राजेश आणि त्याची बायको प्रियाकडे तिच्या क्लिनिकवर तिच्या टेबलसमोर बसले होते. राजेशच्या बायकोच्या पोटावर आता लक्षात येण्याइतपत फरक जाणवत होता.

'' कसं काय.. .काय म्हणते बाळ ... आता फार तडतड करत असेल नाही'' प्रिया तिच्या पोटाकडे पाहात म्हणाली तशी ती लाजली.

'' अगं तडतड म्हणजे ... फारच अवचींद आहे... बापाला पण सोडत नाही ... सारखा लाता मारतो'' राजेश.

तशी  कमल  अजुनच लाजून पाणी पाणी होत होती.

'' बरं ये ... आपण चेकअप करुया'' म्हणत प्रिया पडद्यामागे जायला लागली तशी  कमलही तिच्या मागे मागे जावू लागली.

जोपर्यंत चेकअप सुरु होतं राजेश तिथेच खुर्चीवर बसून होता. त्या मोकळ्या वेळेत त्याने प्रियाच्या कॅबिनमधे एक नजर फिरवली. ज्या जागेवरुन मागच्या वेळेस त्याने एक लहान मुलांचा सुंदर फोटो काढून नेला होता ती जागा अजुनही रिकामीच होती.

त्या दिवशी नंतर कदाचित तिला वेळच मिळाला नसेल...

आणि वेळ तरी कसा मिळणार?...

त्या दिवसापासूनच तर तिच्या जिवनाला ढवळून टाकणाऱ्या घटना घडत होत्या...

विजयचं टर्मीनेशन...

मग त्याचे बिघडलेले मानसिक संतूलन ...

त्याच्या जिवनात येणाऱ्या त्या घटना तेवढ्याच प्रमाणात किंबहुना जास्तप्रमाणात तिच्याही जिवनाला हादरुन सोडत होत्या...

कारण प्रियाचा विजयवर किती जिव आहे हे विजयला जरी कळत नव्हते तरी राजेशला आधीपासूनच पुरेपुर कळले होते. तेवढ्यात प्रिया आणि तिच्या मागोमाग  कमल   पडद्यामागून बाहेर आल्या तशी राजेशच्या विचारांची श्रुंखला तुटली होती.

'' काळजीचं काही कारण नाही ...पण तुम्हाला रेग्यूलर व्हिजीट्स देणं आवश्यक आहे... म्हणजे आपण प्रत्येक बारीकसारीक डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवू शकू'' प्रिया बाहेर येता येताच म्हणाली.

प्रियाच्या बोलण्याचा रोख लक्षात येवून राजेशची बायको  कमल  म्हणाली, '' मागच्या वेळेस आलो तेव्हापासून मधे बरेच दिवस गेले... खरं तर मी मधेच माहेरी जावून आल्यामुळे येवू शकली नाही''

'' पण तिथेतरी दुसऱ्या डॊक्टरांकडे जायला हवं ना'' प्रिया म्हणाली.

'' होना तिथे गेलो होतो आम्ही ... त्यांनीही तसं सगळं नॉर्मल असल्याचं सांगितलं आहे... '' राजेश म्हणाला.

'' मग काही हरकत नाही... आताही पुढे... रेग्यूलर व्हीजीट्स ठेवा... मी काही औषधं लिहून देते... ती तेवढी नियमीत घेत चला .. आणि या काळात हसत खेळत... मजेत रहायला हवं हे काही मी वेगळं सांगायला नको...'' प्रिया म्हणाली.

'' तसं मी हिला पहिल्यापासूनच ... हसत खेळत आणि मजेत ठेवत आलो आहे'' राजेश आपल्या बायकोकडे पाहून गालातल्या गालात हसत म्हणाला.

त्याची बायकोही त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात मंद हसत होती.

'' बरं एवढ्यात विजय भेटला होता का?'' प्रियाने प्रिस्क्रिप्शन लिहिता लिहिताच प्रश्न विचारला.

काही वेळ कुणीच काही बोललं नाही. वातावरणात एक प्रकारचा तणाव स्पष्टपणे जाणवत होता. राजेशलाही या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं काही कळत नव्हतं.

'' हो एकदा भेटला होत... पण आजकाल तो काहीतरी भलतं सलतं.. तोल गेल्यासारखाच बोलतो... काहीतरी प्रिया माझ्यावर सुड उगवू पाहत आहे ... वैगेरे वैगेरे ... काही तरी ... बरळत होता... मी सुध्दा त्याला चांगलं सुनावलं... आणि असं फालतू बोलायचं असेल तर मला पुन्हा भेटू नकोस म्हणून स्पष्ट बजावलं मी त्याला... '' राजेश म्हणाला.

'' राजेश... अरे शेवटी तो आपला मित्रच ना... सध्या त्याची मानसिक स्थिती चांगली नाही आहे ... आणि अश्यावेळी मित्र या नात्याने आपणच त्याला समजून घ्यायला हवं... '' प्रिया आता राजेशकडे रोखन पाहत बोलत होती.

राजेशने मान खाली घालून जणू आपली चूक कबूल केली होती.

'' खरं सांगू प्रिया... मी त्याला हे सगळं बोललो हे खरं... पण मला त्याची ती दयनिय स्थिती पाहवल्या जात नव्हती... एवढ्या हुशार आणि कर्तबगार पोरावर ... परमेश्वराने अशी पाळी आणावी... खरं तर या गोष्टीचा मला राग आला होता... आणि मग माझा तोल सुटला'' राजेश खाली मान घालूनच आपला दाटलेला गळा लपविण्याच्या प्रयत्नात आवंढा गिळत म्हणाला.

प्रियाच्याही डोळ्यात एकदम पाणी आलं होतं पण ताबडतोब तिने स्वत:ला आवरलं. काहीतरी निमित्त करुन ती पुन्हा पडद्याच्या मागे गेली. राजेशला खात्री होती की ती स्वत:चे अश्रु पुसण्यासाठी गेली होती.

पण पुन्हा लगबगीने बाहेर येत म्हणाली, '' अरे ... माझा खरा जीव तुटतो तो या गोष्टीसाठी की त्याच्यावर जे बेतलं आहे... त्यासाठी आपल्याजवळ उपचार उपलब्ध आहे... पण या गोष्टीसाठी त्याला विश्वासात कसं घ्यायचं ते मला कळत नाही आहे...'' प्रिया म्हणाली.

'' मी ही त्याला आधी बरीच समज देण्याचा प्रयत्न केला.. पण तो काहीएक ऐकत नव्हता हे पाहून माझा तोल गेला आणि रागाच्या भरात मी त्याला नाही नाही ते बोललो...'' राजेश म्हणाला.

'' तुझ्याशी तर तो कमीत कमी बोलतो तरी... माझ्याशी तर आजकाल बोलतसुध्दा नाही... तरीही बेशरमसारखी मी त्याच्या घरी जाते...'' प्रिया उसासा टाकत म्हणाली.

'' मग तुम्ही त्याच्या आईला का विश्वासात घेत नाही... कदाचित तो त्याच्या आईचं तरी ऐकेल..'' इतका वेळ शांत असलेली राजेशची बायको म्हणाली.

राजेशने आणि प्रियाने प्रथम तिच्याकडे आणि मग एकमेकांकडे बघितले.

'' त्याच्या बहिणीच्या उपचारासाठी त्याने त्याच्या आईला विश्वासात घेवूनच तिची ट्रिटमेंट सुरु केली होती... पण यावेळी त्याच्या आईचीही मानसिक स्थिती तेवढी पोषक दिसत नाही आहे...'' प्रिया निराशेचा सुरात म्हणाली.

'' कमीत कमी आपण त्याच्या आईला भेटून बोलून तर बघू शकतो...'' राजेश तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

ठरल्या प्रमाणे दुसऱ्याच दिवशी प्रिया आणि राजेश विजय घरी नसतांना विजयच्या आईला जावून भेटले. विजयच्या ट्रिटमेंट विषयी राजेशने आणि प्रियाने आपापल्या परीने तिला समजावून सांगितले. प्रथम तिने सगळं अगदी लक्ष देवून ऐकलं. पण नंतर अचानक त्याची आई अगदी ओक्साबोक्शी रडायला लागली. कदाचित इतके दिवस परिस्थितीला धीराने तोंड देत असलेल्या तिचा शेवटी धीराचा बांध तुटला होता.

'' पोरांनो... तुमचं सगळं पटतय... पण... माझं दुसरं लेकरुही त्याच मार्गावर जात आहे हे कळल्यावर माझ्यावर काय बेतली असेल याची कुणीही कल्पना करु शकत नाही'' विजयची आई पदराने डोळे पुसत म्हणाली.

'' पण काकू आपल्याला जे घडतय त्याला सामोरं तर जावच लागणार'' राजेश तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न करीत्त म्हणाला.

'' त्याने जर नियमित औषधं घेतली तर तो अगदी पुर्णपणे दुरुस्त होवू शकतो... असं डॉ. नाडकर्णी सांगताहेत.

'' तो त्याचा बाप असा... दारु पिऊन सगळे पैसे उधळतो... उरले सुरले ते त्या पोरीच्या ट्रीटमेंटला जातात... अन आता याचीही नोकरी गेली... काय करावं काही कळत नाही... परमेश्वर कोणत्या जन्माची फळं देतो आहे काही कळत नाही'' विजयची आई.

'' पैशाची तुम्ही बिलकूल काळजी नका करु... ते काय करायचं ... कसं करायचं... ते मी सगळं बघते... फक्त तुम्ही विजयला ट्रीटमेंटसाठी तयार करा..बस्स'' प्रिया विजयच्या आईचा हात आपल्या हातात घेत तिला दिलासा देत म्हणाली.

क्रमश:...

With what a deep devotedness of woe
I wept thy absence - o'er and o'er again
Thinking of thee, still thee, till thought grew pain,
And memory, like a drop that, night and day,
Falls cold and ceaseless, wore my heart away!
... Thomas Moore
We must embrace pain and burn it as fuel for our journey.
...Kenji Miyazawa

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. Really It is a very good novel.....Keep it up...
  Asech khup chhan Novels tumhi lihit raha.... I am very much eager to read each n every story...

  ReplyDelete
 2. Khupach chan novel ahe

  mala khup avadal.

  tumcha mail id deu shakal ka?

  ReplyDelete
 3. pudhe kay honar ahe, Vijay bara hoiel, Priyala tiche prem milel, ani nayna ch kay????

  ReplyDelete
 4. waiting for next chaptr....

  ReplyDelete
 5. kharach magcha janmachi ya janmashi kahi asto???

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network