Current Novel - Mrugajal - Ch-43

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Turn your wounds into wisdom.
...Oprah Winfrey
Don't cry when the sun is gone, because the tears won't let you see the stars...Violeta Parra
The turning point in the process of growing up is when you discover the core of strength within you that survives all hurt.
...Max Lerner,The Unfinished Country, 1950

आज जवळपास एक महिन्यानंतर विजय ड्यूटीवरुन घरी परतला होता. आपली बॅग एका हातात घेवून त्याची पावले आपल्या घराच्या दिशेने भराभर चालत होती.

खरंच माणसाला घराची ओढ किती असते...

आणि खरंच ती माणसं किती भाग्यवान ज्यांना घराची ओढ असते...

फाटकापाशी आल्या-आल्या त्याला घराचे दार उघडे दिसले.

कोण आले असावे?...

नक्कीच प्रिया असेल...

पण तिला तर आपण येण्याचा दिवस माहित नव्हता...

म्हणजे ती असेल तर योगायोगच म्हणावा लागेल...

कंपाउंडचे फाटक उघडत त्याने तिथूनच आवाज दिला, '' आई.. ''

आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

कदाचित ती स्वयंपाकात मग्न असेल...

पण तिला तर आपल्या येण्याची कल्पना होती ...

उघड्या दारातून आत जाता जाता त्याने पुन्हा आत आवाज दिला '' आई ''

तरीही काही प्रतिसाद नव्हता. तो उघड्या दारातून आत गेला आणि समोरच्या खोलीत जे कोणी बसलेलं होतं ते पाहून विजयच्या तळपायाची आग मस्तकात गेली. समोरच्या खोलीत त्याची वाट पाहात नयना बसलेली होती. विजय आत येताच ती अदबीने उठून उभी राहाली. ती काही बोलण्यार याच्या पहिलेच -

'' तू?...'' आश्चर्याने विजयच्या तोंडून निघाले.

'' विजय... मी तुझीच वाट पाहत होते'' तिच्या तोंडून निघाले.

'' कशाला?'' कडवटपणे तो म्हणाला, '' माझ्या संसाराची घडी कशीबशी निट बसली आहे ... ती उधळायला?''

'' नाही रे... तू असं कसं बोलतोस?''

'' तसं नाही म्हणू तर... काय आरती ओवाळू तूझी?'' विजय तोल गेल्यागत बोलू लागला.

'' विजय .. प्लीज जिव्हारी लागेल असं काही बोलू नकोस'' नयना गयावया करु लागली.
तिच्या डोळे आता पाणावले होते.

'' मग कशाला आलीस इथे?'' विजय.

'' का मला तुझ्याकडे यायचाही अधिकार नाही? ... एवढी का मी परकी झाले तुला'' नयना.

'' अधिकार?... '' तो उपाहासाने म्हणाला.

'' मी तुझी माफी मागायला आले होते... विजय खरच मी चूकले... माणूस जवळ असतांना त्याला त्याची किंमत कळत नाही .. तो दूर गेल्यावर्च त्याला त्याची किंमत कळते'' नयना

'' मग अजून दूर जायची वाट पहायची होतीस की... वर जायची... '' विजय.

'' विजय प्लीज असं अभद्र बोलू नकोस.. प्लीज मला माफ कर... मी चूकले'' नयना.

'' चूकले? ... आणि मी बरबाद झालो त्याचं काय?'' विजय संतापाने थरथरत बोलत होता.

'' अजून वेळ गेलेली नाही... पपा पुन्हा तुला नोकरीवर घेतील आणि पुन्हा सर्व पुर्ववत होईल'' नयना त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली.

'' तो तुझा बाप...माझ्या जिवनाची घडी जेव्हा त्याला वाटेल तेव्हा बिघडवायला.. आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा निट बसवायला ... काय कुठला देव लागून जातो... '' विजय बोलत होता.

विजयची आई घाईघाईने फाटक उघडून दाराकडे निघाली. तिचा मुलगा आज जवळपास एका महिन्यानंतर घरी येत आहे याचा आनंद तिच्या प्रत्येक हालचालीतून जाणवत होता. ती दाराजवळ येवून पोहोचली आणि तिथेच थबकली. तिच्या आनंदावर जणू विरजण पडलं होतं. घरातून येणाऱ्या विजयच्या जोरजोरात आणि रागाने बोलण्याच्या आवाजाने ती संभ्रमात पडली.

काय झालं असेल?...

तो एवढा कुणावर रागावतो आहे?...

एवढा तो प्रथमच कुणावर रागे भरत होता...

बापात आणि पोरात कशावरुन बिनसलं की काय?...

नाही बापाचा आणि पोराचा संवाद तर दिसत नाही...

मग प्रियावर किंवा राजेशवर तर नाही?...

एवढ्या हक्काने तो त्या दोघांवरच रागावू शकत होता...

पण प्रियावर रागावने शक्य नाही ...

मग राजेशच असेल...

नाहीतरी एवढ्यात दोघांचं छोट्याछोट्या गोष्टींवरुन बिनसायचं...

ती हळूच घरात गेली. विजय समोरच्या खोलीतच होता आणि तो अजूनही रागाने बोलत होता,

'' जेव्हा मी तुझ्या प्रेमापोटी बरबाद व्हायच्या मार्गावर होतो... तेव्हा कुठे होतीस तू?... आणि आता... जेव्हा मी प्रियाच्या मदतीने कसाबसा सावरलो आहे... तेव्हा आली पुन्हा मोडता घालायला... माझी तर खात्री आहे... की आता तुला प्रियाची इर्शा वाटत असेल... आणि कागं... कमीत कमी तुला या गोष्टीची तर लाज वाटायला हवी होती की आता तुझं लग्न झालं आहे...बेशरमपणाची एवढी हद्द पार करशील... असं वाटलं नव्हतं कधी मला..''
'' हं आत्ता लक्षात आलं...'' विजय पुढे बोलत होता, '' ... उडत उडत माझ्या कानावरही आलं होतं... ज्याच्याशी लग्न केलं त्याने फसवलं ना तुला ... त्याचं आधीच लग्न झालेलं होतं म्हणे ... परदेशात नोकरी करणारा पाहिजे होताना ... मग असंच होणार... तु आणि तो तुझा उर्मट बाप... पैशाच्या मागे धावणारे लालची लोकहो... बरं झालं तुम्हाला चांगली अद्दल घडली... मला तर तुम्हाबद्दल जराही सहानुभूती वाटत नाही आहे.. ''
ज्या दिशेने हातवारे करुन रागाने विजय हे सगळं बोलत होता तिकडे बघितल्यावर विजयच्या आईला तिच्या पायाखालची जणू जमीन सरकावी असं वाटलं होतं. तिच्या शरीरातली शक्ती जणू एकाएकी क्षीण व्हावी असं तिला वाटलं. तिचे हातपाय गळून गेले होते आणि ती मटकन खालीच बसली.

'' कुलटा चालती हो या घरातून...तुझी सावलीही पडायला नको आता या घरावर'' विजय अजूनही रागाने थरथरत बोलत होता.

त्याच्या रागाचा पारा अजूनही उतरायचं नाव घेत नव्हता. घरात आई आली आहे याचंही त्याला भान नव्हतं. विजयच्या आईने जणू पुन्हा खात्री करुन घ्यावे असं, विजय ज्या खुर्चीकडे पाहून आणि हातवारे करुन बोलत होता त्या खुर्चीकडे बघीतलं. ती खुर्ची रिकामी होती आणि त्या खुर्चीवर कुणीही बसलेलं नव्हतं. त्या खुर्चीवर प्रत्यक्ष नयना बसलेली असती तर कदाचीत विजयच्या आईला एवढं काही वाटलं नसतं. पण त्या खुर्चीवर कुणीही बसलेलं नसून ती खुर्ची पुर्णपणे रिकामी होती ही विजयच्या आईसाठी अजुनच काळजीची बाब होती.
विजयची आई कशीबशी सावरत उठली. तरीही विजयला तिच्या उपस्थीतीची जाणीव झाली नव्हती.

कदाचित स्वत:च्या उपस्थीतीची जाणीव करुन देण्यासाठी ती विजयला म्हणाली, '' पोरा केव्हा आलास?''

विजयने वळून आपल्या आईकडे बघितले. पण त्याच्या डोळ्यात त्याच्या आईला इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर होणाऱ्या आनंदाचा लवलेशही दिसत नव्हता.

'' बघना आई... ही बघ आता आपलं घर उध्वस्त करायला आली आहे... अवदसा'' तो म्हणाला.

आतामात्र त्याच्या आईच्याने राहवले गेले नाही. ती तावातावाने उठली आणि विजयच्या खांद्याला गदगद हलवित म्हणाली, '' बघ तिकडे ... बघ कुणी आहे?''

रागाच्या भरात विजयच्या आईने ती रिकामी खुर्ची लाथेने खाली पाडली.

'' बघ ती खुर्ची रिकामी आहे पोरा'' ती म्हणाली.

तरीही विजय जणू त्याच्या आईचंच काहीतरी चुकत आहे या अविर्भावाने तिच्याकडे पाहात होता. विजयची आई आता तिने लाथेने पाडलेल्या खुर्चीचा आधार घेवून खाली बसली आणि ढसढसा रडायला लागली.

क्रमश:...

Turn your wounds into wisdom.
...Oprah Winfrey
Don't cry when the sun is gone, because the tears won't let you see the stars...Violeta Parra
The turning point in the process of growing up is when you discover the core of strength within you that survives all hurt.
...Max Lerner,The Unfinished Country, 1950

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 1. namaskar.. mi mrugjalchi niymit vachak ahe ha lekh mala awadla karan ha satyasthitivar aadharlela ahe.. sudhir sir keep it up!! pan tari hi 1 shanka ahe.. rajeshchya lagnachya diwashi vijaychya bahinivar jo prasang ghadla tyache ajun kuthech vishleshan kele nahit.. tyachi link lavli tar katha sarv bajune ektrit hoil

  all the best..

  ReplyDelete
  Replies
  1. HI,
   Varil Prashnache Uttar Apoap Samajun Jate, Jya prakare Rajesh la Bhaas Hou lagtat, Tyaach Prakare Tyachya Bahinilahi To zalela ek Bhaas hota.

   to bolvnara mulaga, Room madhil Jabardasti ha sarva tichya ajarpanache lakshane hoti.

   Rajesh la jase Bagichya Baherchi CAR, Garden madhe Yenari Nayana. Tasaach to hi Bhaas Hota.

   Delete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network