Sahitya Book - Mrugajal- Ch-44

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Today's Quotes:
There is something beautiful about all scars of whatever nature.A scar means the hurt is over, the wound is closed and healed, done with.
.... Harry Crews
Man performs and engenders so much more than he can or should have to bear.That's how he finds that he can bear anything.
... William Faulkner

दुपारी जेवण वैगेरे झाल्यावर विजय बेडवर पडून आराम करीत होता. खाली जमिनीवर बसून त्याची आई दळण निट करीत होती. ती अजुनही सकाळच्या धक्यातून सावरली नव्हती. पण तिला थकून हारुन किंवा थांबून चालणार नव्हते. आता घरात ती एकटीच तर उरली होती जिच्यामुळे घर चालणार होतं. घर वेगवेगळ्या भागात विभाजीत होऊन विस्कळीत होत होतं. आणि तिला त्या भागांना जोडणारा दूवा म्हणून काम करायचं होतं. दळण निट करता करता तिने तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघितले. तो बेडवर पडला होता, पण त्याचे डोळे उघडे होते आणि तो एकसारखा छताकडे पाहत होता. जणू त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान माजलं होतं.
तिला त्याच्याशी बरच बोलायचं होतं. विषेशकरुन प्रियाच्या बाबतीत बोलायचं होतं. तो गेल्यापासूनच्या त्या एका महिन्यात बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या, त्या सगळ्या तिला सांगायच्या होत्या.

पण ही योग्य वेळ होती का?...

त्याची तर मानसिक स्थिती अजुनच नाजुक झालेली दिसत होती...

अश्यात त्याला त्या सगळ्या गोष्टी सांगणं योग्य होईल का?..

तिने अंदाज घेण्याच्या उद्देशाने, सहजच विचारावे असे विचारले, '' तिथलं ऑफीसचं काम निट झालं ना सगळं?''

तो काहीच बोलला नाही. अजुनही तो आपल्याच विचारात मग्न दिसत होता. त्याच्या आईने त्याच्या हाताला स्पर्श करुन आवाज दिला, '' विजय''

'' हो... काय?'' तो एकदम विचारातून जागा झाल्यासारखा म्हणाला.

''नाही ... म्हटलं... तिथलं ऑफीसचं काम निट झालं ना सगळं?'' त्याच्या आईने पुन्हा विचारले.

'' हो झालंना... मी गेल्यावर .. दोन दिवसाने मागून प्रिया तिथे आली म्हणून बरं झालं... नाहीतर खुप बोअर झालं असतं'' विजय म्हणाला.

विजयच्या आईला जणू विजेचा झटका बसावा असं झालं. ती दळण निट करायचं थांबवून आश्चर्याने विजयकडे बघायला लागली. तिने दळणाचं ताट उचलून बाजूला ठेवलं आणि तावातावाने त्याच्यासमोर उभी ठाकत म्हणाली, '' पोरा तुला काय झालं?.... पुन्हा येड्यासारखा का बरळतोस? ''

'' का? काय झालं?'' विजय तिला या अनपेक्षीत पावित्र्यात बघून बेडवर उठून बसत म्हणाला.

'' तु आला तेव्हापासून तुला मी ... सांगावं म्हणत होते... पण तु आला अन त्या नयनाचं भाटपुराण घेवून बसला... म्हणून तुला सांगावं की नाही... अजुनही मला काही कळत नाही'' विजयची आई जणू स्वत:च त्याला सांगावं की नाही हे चाचपडून पाहत होती.

'' आता काय झालं हे मला सांगशील तरच कळेल ना?'' विजय म्हणाला.

'' तु गेल्याच्या दुसऱ्या दिवशीच प्रियाचा ऍक्सीडेंट झाला... तिच्या घराच्या गच्चीवरुन पडली ती... डोक्याला बराच मार लागला आहे... आणि तेव्हापासून अजूनही ती कोमातच आहे...'' विजयच्या आईने हिम्मत करुन सांगीतले.

विजय कॉटवरुन उठून उभा राहाला, '' कसं शक्य आहे?... काय बोलतेस आई तू?... मी ड्यूटीवर गेल्यावर दोन दिवसाने तर ती तिथं आली होती... मग गच्चीवरुन पडणे कसं शक्य आहे... आणि नुसती आलीच नाही तर आम्ही चांगले 15 दिवस सोबत होतो... खरं म्हणजे तुला काय सांगू आम्ही तिथे किती फिरलो... तुला माहित आहे... तिथे आम्ही एका पुरातन शंकराच्या देवळातही गेलो होतो..'' विजय त्याच्या आईला विश्वास देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

विजयची आई पुन्हा खाली बसुन रडायला लागली.

'' देवा ... माझ्या पोराला यातून सोडव रे बाबा... काही अपराध झाला असेल तर त्याची शिक्षा मला दे... पण माझ्या पोराला यातून सोडव रे बाबा''

रडता रडता विजयच्या आईचे लक्ष बेडखाली ठेवलेल्या विजयच्या बॅगकडे गेले. हीच ती बॅग होती जी त्याने ड्यूटीवर आपल्या सोबत नेली होती. रडता रडता ती एकदम थांबली आणि तिने ती बेडखाली ठेवलेली बॅग तावातावाने ओढून बाहेर काढली. बॅग उघडून ती वेड्यासारखी त्यातल्या वस्तू इकडे तिकडे फेकायला लागली. बॅगच्या बुडात ठेवलेल्या औषधाच्या गोळ्यांकडे आश्चर्याने बघत ती म्हणाली, '' जातांना जश्या ठेवल्या तश्याच आहेत... एकही गोळी खाल्ली नाहीस''

विजयच्या आईने रागाने त्या गोळ्या विजयकडे फेकल्या. ती पुन्हा रडायला लागली, '' कोणत्या जन्माचा सूड घेत आहेस रे पोरा... ''

'' आई तुला खोटं वाटतंना... हव तर प्रियाला विचार... आम्ही वृंदावन गार्डनला गेलो होतो की नाही ते?'' विजय अजूनही तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करीत होता.

आता मात्र विजयच्या आईच्याने राहवले गेले नाही. ती रडायची एकदम थांबली. एका हाताने आपले अश्रू पुसत दुसऱ्या हाताने विजयचा हात पकडत त्याला दरवाच्याकडे खेचत म्हणाली, '' चल... माझ्याबरोबर चल... एकदाचा सोक्षमोक्षच होवू दे''

क्रमश:...

Today's Quotes:
There is something beautiful about all scars of whatever nature.A scar means the hurt is over, the wound is closed and healed, done with.
.... Harry Crews
Man performs and engenders so much more than he can or should have to bear.That's how he finds that he can bear anything.
... William Faulkner

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. so Nice khup chan hya story ne new valan ghetle ahe ata rahavat nahi next post plz.

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network