Literature Book Online : Mrugajal - Ch- 42

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Thoughts Today:
Pain is inevitable.Suffering is optional.
... M. Kathleen Casey
I expanded with the joy of your love and presence but now that you're gone I just feel bloated.
...Carrie Latet
The robbed that smiles, steals something from the thief.
... William Shakespeare,Othello

विजयची आई स्वयंपाकात मग्न होती. तेवढ्यात प्रिया तिथे आली. एवढ्यात प्रिया आधीसारखी येण्याबाबत कोणती वेळ पाळत नसे. कारण विजय आता तिच्यासोबत निट वागत असे. किंबहुना आतातर त्याला नेहमी तिच्या येण्याची वाट राहत असे आणि प्रियालाही त्याला भेटण्याची ओढ ... तशी ती तर पहिल्यापासूनच होती. पण आता तो जसा तिच्या भावनांची कदर करायला लागला होता ती ओढ अजुनच वाढली होती.

'' ये पोरी ये...'' खुशीतच विजयची आई म्हणाली.

बऱ्याच दिवसांपासून प्रियाने तिला एवढे खुश पाहाले होते. प्रियालाही त्याचे कारण माहित होते. आणि ते कारण तिलाच काय घरातल्या सगळ्यांनाच खुश होण्यास पुरेसे होते. पण दुर्दैवाची गोष्ट ही होती की त्या आनंदात फक्त त्याची आईच सहभागी होवू शकत होती. कारण त्याची बहिण तर या सगळ्या भावना समजण्यास तिच्या आजारामुळे असमर्थ होती. आणि त्याचे वडील तर जणू घरातल्या सुख:दु:खाच्या पुढे गेले होते. घरातल्या सुखादु:खाशी त्यांना काही कर्तव्य दिसत नव्हते. कधी कधी घराच्या सुख:दु:खासमोर पुर्ण मानव जातीच्या सुख दु:खाचा विचार करणाऱ्या माणसाच्या बाबतीत तसे होते. पण दुर्दैवाने गोष्ट तशीही नव्हती.

'' विजय कुठे आहे?'' प्रियाने विचारले.

'' पोरी आज मी खुप खुश आहे... ''

'' हो ते तर दिसतच आहे... तुमच्या चेहऱ्यावर एवढा ओसंडून वाहणारा आनंद मी प्रथमच बघत आहे'' प्रिया.

''...कितीदिवसानंतर आज पोरगा पहिल्यांदा घराच्या बाहेर पडला... तू काय जादू केलीस कुणास ठाऊक ... हल्ली फार शहाण्यासारखा वागतो... सगळी औषधं स्वत:च घेतो...''
विजयची आई गहिवरुन बोलत होती.

हो विजयमधे खुपच फरक पडला होता. ते प्रियालाही जाणवत होते. कदाचित औषधाचा परिणाम असावा. औषधाच्या परिणामामुळे तो औषधं व्यवस्थित घेत होता. गोष्ट थोडी अगम्यच होती. किंवा परिस्थितीची खरीखुरी जाणीव त्याला झाली होती. ते काहीही असो तो आता स्वत:होवून औषधं घेत आहे आणि डॉक्टरांना पुर्णपणे सहकार्य करत आहे हे प्रियासाठी सगळ्यात महत्वाचे होते.

'' असाच रेग्यूलर औषधं घेत राहाला तर तो लवकरच बरा होईल... '' प्रियाही खुशीत म्हणाली.

'' पोरी तुझ्या तोंडात तुप साखर पडो..'' विजयची आई न राहवून म्हणाली.

तिला बिचारीला तिच्या घराची घडी पुर्णपणे निट जरी नाही तरी विजय चांगला होता तेव्हा जशी होती तशी जरी झाली तरी समाधान होते. एवढ्या गोष्टी हातातून रेती निसटावी तशा निसटून जात असतांना, तेवढी एक गोष्ट तरी तिच्या हातात राहावी, कमीत कमी एवढी अपेक्षा तर ती जिवनापासून करु शकत होती.

प्रिया टेबलवर पेशंट चेक करीत होती. पण तिचं सगळं लक्ष बाहेर दाराकडे लागलेलं होतं. विजयची नेहमीची यायची वेळ झाली होती. आजकाल तो न चुकता यावेळी तिला क्लिनिकवर भेटण्यास येत असे. तेवढ्यात घाईघाईने विजय आत आला. तो खुप खुशीत दिसत होता.

'' प्रिया तुला माहित आहे? आज मी खुप खुश आहे'' त्याने आल्या आल्या आनंदाच्या भरात प्रियाला कंबरेला धरुन चक्क वर उचलले.

'' अरे ... अरे ... काय झालं?... या पेशंटचं चेकअप तर होवू देशील की नाही? '' प्रिया त्या पेशंटकडे बघून गोरीमोरी होत म्हणाली.

'' तुला माहित नाही ... आज मी किती खुश आहे...'' तो तिला खाली ठेवीत म्हणाला.

'' ते तर ... दिसतच आहे... पण काय झालं ते तर सांगशील?'' ती म्हणाली.

'' अगं ... हे बघ... मला पुन्हा नोकरी लागली आहे..'' तो तिला अपॉइन्टमेंट ऑर्डर दाखवित म्हणाला.

'' अरे वा... अभिनंदन... बघू'' प्रिया अपॉइन्टमेंन्ट ऑर्डर हातात घेत म्हणाली.

खरं तर त्याला नोकरी मिळण्यात प्रियाचाच बऱ्यापैकी सहभाग होता. म्हणजे तसा प्रत्यक्ष जरी नाही तरी अप्रत्यक्ष होताच. कारण औषधांचा परिणाम जरी दिसु लागला होता तरी विजयला आता पुढे काय हा मोठा यक्षप्रश्न होता. आणि कंपनीची गेलेली नोकरी मिळणं तर शक्य नव्हतं. तसं तिने तेही पडताळून बघितलं होतं. पण त्याचा बॉस त्याबाबतीत काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. कमीत कमी आता नयनाचं लग्न झाल्यानंतर आणि आता तिथे नयना नसतांना त्यांनी त्याला परत कामावर घ्यायला काहीच हरकत नव्हती. पण दिलेली टर्मीनेशन ऑर्डर मागे घेण्यात त्या माणसाचा 'इगो' आड येत होता. आणि कदाचित त्यांना त्या मुद्द्यावर पुन्हा उलट सुलट चर्चा नको होती. आणि 'त्यांची स्वत:ची मुलगी' ही नाजुक बाब त्या मुद्द्याचा एक भाग होती. म्हणून कदाचित ते आपल्या भूमीकेवर अगदी ठाम होते. त्यामुळे प्रियाने मग दुसऱ्या शक्यता पडताळून बघण्यास सुरवात केली होती. आणि विजयचा पुन्हा पुर्वीचा आग्रह होता की त्याला नोकरी तिथेच त्याच शहरात मिळावी की जेणेकरुन तो त्याच्या कुटुंबाकडे लक्ष देवू शकेल. पण त्या शहरात जी नोकरी त्याची सुटली होती तिच मोठ्या मुष्कीलीने मिळाली होती. आणि त्याच शहरात दुसरीकडे तरी त्याच्या लायकीची नोकरी सध्यातरी उपलब्ध नव्हती. अश्या परिस्थितीत त्याला दुसरीकडे बाहेरगावी नोकरीसाठी अप्लीकेशन्स भरण्यास प्रवृत्त करणे फार आवश्यक होते. आणि इथेच प्रियाने आपली भूमिका चोखपणे पार पाडली होती. त्याचा तिथेच नोकरी करण्याचा जो मेंटल ब्लॉक होता तो काढण्याचं महत्वाचं काम तिने केलं होतं. दुसरीकडे नोकरीसाठी त्याच्या सुटलेल्या नोकरीचे एक्सपरीयंस सर्टीफिकेटही आवश्यक होते. आणि ते जर नाही जोडले तर इतके दिवस त्याने काय केले या प्रश्नाला त्याला प्रत्येक जागी तोंड द्यावे लागणार होते. आणि ते एक्सपरीयंस सर्टीफिकेट नयनाचे वडिल वाईट शेरा मारल्याशिवाय देणार नाहीत याची प्रियाला खात्री होती. म्हणून तिने त्यांची पुन्हा प्रत्यक्ष भेट घेवून नोकरीवर जर ते परत त्याला घेवू शकत नसतील तर कमीत कमी काही वाईट शेरा न मारता एक्सपरीयंस सर्टीफिकेट तरी द्यावं असा आग्रह धरला होता. आणि बरेच प्रयत्न केल्यानंतर, त्यांना पुन्हा पुन्हा भेटून विनवनी केल्यानंतर कुठे ती चांगले सर्टीफिकेट देण्यात त्यांचे मन वळवीन्यात यशस्वी झाली होती. या सगळ्या गोष्टी ती विजयला मधे न घेताच करत होती. कारण तिची इच्छा होती की या सगळ्या गोष्टींमुळे विजयला उगीचच पुन्हा मानसिक त्रास होवू नये. कारण तो जरी बऱ्यापैकी बरा झाला होता तरी त्याचे जुने वाईट अनुभव अजूनही ताजेच होते.

शेवटी तिला या गोष्टीचा आनंद होता की तिच्या मेहनतीला फळ येवून विजयला पुन्हा नव्याने आयूष्य उभारण्याची एक नवी संधी मिळाली होती. आणि त्यातच जमेची बाजु म्हणजे... त्याला इथेच या शहरातच नोकरी मिळाली होती. फक्त अधून मधून त्याला ड्यूटीनिमित्त बाहेरगावी जावे लागणार होते.

बस स्टॉपवर बसची वाट पाहत विजय उभा होता. त्याच्या डाव्या बाजुने त्याची बॅग ठेवलेली होती आणि उजव्या बाजूने प्रिया मलिन चेहऱ्याने उभी होती. विजयही नाराज दिसत होता.

'' एका महिन्याची तर गोष्ट आहे... काय करणार ड्यूटी आहे ... जावे तर लागणारच...'' विजय प्रियाला समजवण्याच्या सुरात म्हणाला.

'' एक महिना ... म्हणजे तुला कमी वाटत असेल... इथे एक एक क्षण कठीण वाटतो'' प्रिया म्हणाली.

विजयचा चेहरा अचानक एका कल्पनेने चमकला.

'' जर तुही माझ्याबरोबर आलीस तर ... '' विजयने प्रियाच्या चेहऱ्यावर तिची प्रतिक्रिया शोधत म्हटले.

'' मी तुझ्यासोबत.. काहितरी काय बोलतोस?... माझे वडील जावू देणार आहेत का?... आधीच तुझं नाव काढलं की ते भडकतात... आणि... '' प्रिया वाक्य अर्धवट ठेवीत म्हणाली.

'' त्यांचही बरोबर आहे म्हणा... एका वेड्याच्या नादाला आपली मुलगी लागलेली कोणत्या बापाला आवडेल... काहीतरी दुसरं कारण काढून तू नाही का येवू शकणार?'' विजयने दुसरी कल्पना सुचवली.

'' तसं म्हणतोस?... '' प्रिया विचार करीत म्हणाली, '' एक काम कर... तु पुढं हो... मी बघते मागून काही करता आले तर... कारण क्लिनिकवरही काहीतरी व्यवस्था केल्याशिवाय येथून हलता येणार नाही''

तेवढ्यात बस आली.

विजय बॅग उचलत म्हणाला, ' नक्की?''

ते दोघंही बसकडे जायला लागले.

'' प्रॉमिस नाही करु शकणार ... कारण क्लिनिकवर सुट्टी मिळण्यावर आणि तिथे काहीतरी व्यवस्था होण्यावर सगळे अवलंबून आहे... पण प्रयत्न नक्की करीन'' प्रिया त्याच्या सोबत बसच्या दारापर्यंत जात म्हणाली.

'' प्रयत्न नाही ... आलीच पाहिजेस... मी वाट पाहिन..'' विजय बसमधे चढता चढता म्हणाला.

बस निघाली. विजयने बसच्या खिडकीतून हात हलवित म्हटले, '' मी वाट पाहिन''

'' औषधं वैगेरे निट वेळेवर घेत जा'' प्रिया हात हलवित म्हणाली.

बस जात होती आणि कितीतरी वेळ हात हलवित प्रिया तिथे उभी होती.

क्रमश:...


Thoughts Today:
Pain is inevitable.Suffering is optional.
... M. Kathleen Casey
I expanded with the joy of your love and presence but now that you're gone I just feel bloated.
...Carrie Latet
The robbed that smiles, steals something from the thief.
... William Shakespeare,Othello

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network