Latest Novel - Mrugajal - Ch-41

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Today's Quotes:
A man begins cutting his wisdom teeth the first time he bites off more than he can chew.
... Herb Caen
Common sense in an uncommon degree is what the world calls wisdom.
... Samuel Taylor Coleridge
He dares to be a fool, and that is the first step in the direction of wisdom.
... James Huneker

प्रिया विजयकडे नियमीत येत जात असे पण विजयचा तिच्याशी अबोला अजुनही चालूच होता. तिने त्याच्याशी जबरदस्ती किंवा काही झालेच नाही असे भासवून बऱ्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण तो त्याच्या तिच्याबद्दल घेतलेल्या भूमीकेशी आणि तिच्याबद्दल केलेल्या ग्रहाविषयी अगदी ठाम दिसत होता. उलट तिने बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तिचा अजूनच पायउतारा करीत असे. नंतर नंतर तर ती नुसती त्याच्या घरी जरी दिसली तरी तो तिचा पायउतारा करण्याचा मौका सोडत नसे. त्यामुळे प्रिया विजयकडे शक्यतो संध्याकाळी यायची. कारण संध्याकाळी शक्यतो तो झोपलेला असायचा. आणि तो जर झोपलेला नसला तर ती काहीतरी निमीत्त करुन लवकरात लवकर तिच्या घरी परत जायचं बघायची. एक दिवस अशीच प्रिया विजय झोपलेला असतांना विजयच्या अंगणात लाकडी खुर्चीवर बसली होती. विजय घरातून बाहेर आला. तो सहसा इतक्या लवकर उठत नसे. पण आज उठला होता. त्याची चाहुल लागताच अक्षरश: तिच्या अंगावर शहारे यायला लागले होते. कारण तो काय बोलेल आणि तिचा कसा अपमान करेल याचा काही नेम नसायचा. बऱ्याच दिवसांपासून ती त्याच्याशी एकदम आमना सामना होण्याचे यशस्वीपणे टाळत आली होती. पण आज शेवटी तिच्या त्याच्याशी सामना झालाच होता. एकदमही काहीही कारण नसतांना तिथन निघून जाणेही तिला योग्य वाटले नाही. शेवटी हृदयावर दगड ठेवून आल्या प्रसंगाला तोंड देण्याचे तिने ठरवले. विजय जवळ येताच त्याची नेहमीची तिरस्काराची नजर चुकविण्यासाठी ती फाटकाच्या बाहेर बघायला लागली. नेहमीप्रमाणे दुरुनच तिला काहीतरी बोलून किंवा तिच्यावर तिरस्काराची नजर टाकून तिला टाळून सरळ पुन्हा आत न जाता तो तिच्या शेजारी येवून उभा राहाला होता.

आज याचा आकांडतांडव करुन काहीतरी मोठा अपमान करण्याचा बेत दिसतो...

प्रियाने ताडले. प्रियाने इकडेतिकडे आपली नजर फिरवली. जवळपासही कुणी दिसत नव्हते. ती तिथे अंगणात एकटीच होती. म्हणजे त्याच्या तावडीतून सूटका करण्यासही जवळपास कुणी नव्हते. कारण त्याची आई जवळपास असतांना तो तिचा अपमान करायचा नाही असं नाही पण तेवढा अपमान करण्याची त्याची हिंमत व्हायची नाही.

'' प्रिया...'' विजयच्या गळ्यातून अस्पष्ट असा क्षीण आवाज निघाला.

विश्वास न बसून खात्री करण्यासाठी प्रियाने आपल्या डोळ्याच्या कडांतून विजयकडे बघितले.

हो... तो तिच्या शेजारी उभा राहून तिच्याशीच बोलत होता...

कितीतरी दिवसापासून प्रथमच ती त्याच्या आवाजात मृदुता अनुभवत होती. तरीही प्रियाची त्याच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत होत नव्हती. बऱ्याच दिवसापासून ती त्याच्या नजरेत तिच्याबद्दल तिरस्कार पाहत आली होती. जिवनातल्या कितीही मोठ्या संकटांना तोंड देण्याची हिम्मत तिच्यात होती पण विजयच्या नजरेत तिच्याबद्दल तिरस्कार बघण्याची हिम्मत तिच्यात नव्हती.

विजय आता दुसरी एक खुर्ची ओढून तिच्या शेजारी बसला होता.

आता हा आपल्याशी काय बोलणार?...

इतके दिवस नुसता तिरस्काराने बघत होता...किंवा अपमानास्पद एकदोन शब्द बोलायचा... मात्र आज हा काही तरी कटू बोलून आपले इथे येणेही बंद करणार की काय?...

पण नाही तो कितीही कटू बोलला तरी आपलं इथे येणं बंद होणं शक्य नाही...

कितीही झालं तरी तो जो वागतो... बोलतो... यात त्याचा काहीच दोष नाही...

तो काहीही बोलला तरी आपण नुसतं एकून घ्यायचं...

जणू मनाचा पक्का निर्धार करुन ती ताठ होवून बसली.
त्याने खुर्ची तिच्या अजून जवळ सरकवली.
तिच्या अंगावर अक्षरश: काटे उभे राहाले होते. बऱ्याच दिवसांपासून तो तिच्या इतक्या जवळ बसला नव्हता. आधीही तो तिच्या इतक्या जवळ बसला नव्हता असे नाही पण प्रथमच तिच्या अंगावर रोमांच उभे न राहता काटे उभे राहाले होते.

'' किती त्रास घेशील आमच्यासाठी...'' तो बोलला.

त्याच्या बोलण्याचा सुर अजूनही प्रियाच्या लक्षात आला नव्हता.

तो उपरोधाने तर बोलत नाही...

'' तुझं उभं आयूष्य पडलं आहे... का आपलं किमती आयूष्य खर्ची पाडते आहेस या वेड्यासाठी '' तो पुढे म्हणाला.

तो उपरोधाने तर नक्कीच बोलत नव्हता...

पण अजूनही त्याचा मुद्दा तिच्या लक्षात येत नव्हता. म्हणून प्रिया अजूनही इकडे तिकडे बघत त्याच्याशी नजरा नजर टाळत होती.

'' खरंच माणूस किती वेडा असतो.. सुख, आनंद, प्रेम त्याच्या जवळ असतांना तो साऱ्या जगात शोधायला निघतो '' तो बोलतच होता - त्याच्या नेहमीच्या फिलॉसॉफर शैलीत.

प्रिया अजूनही इकडे तिकडे बघत होती. पण यावेळी त्याच्याशी नजरा नजर टाळण्यासाठी नाही तर आपल्या डोळ्यात आलेली आसवं लपविण्यासाठी. त्याच्या आवाजात पश्चाताप स्पष्ट जाणवत होता. इतक्या दिवसानंतर तो प्रथमच तिच्याशी बोलत होता. आणि त्याच्या नेहमीच्या फिलॉसॉफीकल शैलीत. प्रिया अजूनही आपल्या डोळ्यातली आसवं लपविण्याचा असफल प्रयत्न करीत होती.

'' मी माफीच्या लायक नाहीये... '' विजय.

आता मात्र प्रिया आपलां हुंदका आवरु शकली नव्हती.

'' पण ... खरंच ... मी तुला खुप छळलं आहे.. मला माफ...''

प्रिया एकदम तिच्या खुर्चीवरुन उठली. विजयसुध्दा उठून उभा राहाला. प्रियाने चट्कन जवळ जावून विजयच्या तोंडावर आपला हात ठेवला. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रूंच्या धारा थांबायचं नाव घेत नव्हत्या.
विजयच्या डोळ्यातही अश्रू तरळू लागले होते. त्याचा गळा भरुन आला.

'' मला माफ करशील?..'' तिचा हात आपल्या तोंडावरुन सारत तो कसाबसा बोलला.

कितीतरी दिवसांच्या विरहानंतर जणू ते प्रथमच भेटत असावे या आवेगाने एकदम एकमेकांच्या मिठीत शिरुन ते ओक्साबोक्शी रडायला लागले.

क्रमश:...

Today's Quotes:
A man begins cutting his wisdom teeth the first time he bites off more than he can chew.
... Herb Caen
Common sense in an uncommon degree is what the world calls wisdom.
... Samuel Taylor Coleridge
He dares to be a fool, and that is the first step in the direction of wisdom.
... James Huneker

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

9 comments:

 1. Story must turn ghet ahe........pan ek doubt hota priya sarkhya muli ajhi ahet ka?

  ReplyDelete
 2. chan valan ghetey story..chan vatty..priya aani vijay doghe parat ektr yetayet.nice story.

  ReplyDelete
 3. KHUPCH CHHAN, NISWARTHI NIRAGAS PREMACH UTTAM UDAHARaN

  ReplyDelete
 4. What a nice turn in a story...........but this love is still in botha harts..........????

  ReplyDelete
 5. khupach chan.. waw... maal khup awadal he....

  ReplyDelete
 6. khupach chhan love story aahe ......

  ReplyDelete
 7. mulana mulinchi kimat evdya ushira ka samjte???

  ReplyDelete
 8. Priya sarkhi ekpan mulgi ajun ka nahi amla bheti ani ya aushyat ti bhetel ka? Kharch hi True story ahae ka????

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network